Jalgaon

?️ जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू – डॉ. अविनाश ढाकणे

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू – डॉ. अविनाश ढाकणे

विक्की खोकरे

जळगाव ;- जिल्हयात करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून संपूर्ण जळगांव जिल्हयात दिनांक ४ मे रोजी रात्री १२ वाजेपासून पासून ते दिनांक 17 मे रोजीच्या रात्री १२ वाजे पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 चे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत .

आदेश पुढीलप्रमाणे ——-

1) जळगांव जिल्हयात नमूद कालावधीत कोणतीही व्यक्‍ती / नागरीक यांना सायंकाळी 07.00 ते सकाळी 07.00
वाजेपावेतो अत्यावश्यक बाब वगळता, अनावश्यकरीत्या फिरण्यास, मुक्‍तपणे संचार करण्यास मनाई असेल.
(आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा व अत्यावश्यक सेवा वगळता )

2) 65 वर्षांवरील जेष्ठ नागरीक, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील बालके, गंभीर आजार असलेल्या व्यक्‍ती यांनी
घरीच रहावे. तथापि अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा घेण्याकरीता संबंधितांना मुभा असेल.

3) जळगांव जिल्हयातील घेण्यात येणा-या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस,
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार
भरण्यास बंदी घालण्यात येत आहे.

4) जळगांव जिल्हयात कोणतीही व्यक्‍ती / नागरीक यांना सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक
राहील. तसेच उघडयाव अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी राहील. तथापी सदरील बाबींचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर नमूद कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button