ChimurMaharashtra

पिपर्डा येथे जेष्ठ रंगकर्मीचा सन्मान सोहळा – जिल्हयातील रंगकर्मीचा सत्कार

पिपर्डा येथे जेष्ठ रंगकर्मीचा सन्मान सोहळा
– जिल्हयातील रंगकर्मीचा सत्कार

चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके

ग्रामशक्ती युवा विचार मंच तथा ग्रामपंचायत पिपर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पिपर्डा येथे जेष्ठ रंगकर्मी सन्मान सोहळा कार्यक्रम १५ मार्च रवीवारला सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय पिपर्डा येथील पटांगनावर आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ रत्न पुरस्कार प्राप्त जेष्ठ कलावंत, नाटयलेखक, दिग्दर्शक सदानंद बोरकर राहनार असुन कार्यक्रमाचे उद्धघाटन चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक व सह उद्धघाटन ग्रा.प.पिपर्डाच्या सरपंच दुर्गाताई कोडापे करनार आहेत.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी मुंबईचे कामगार नेता रंगनाथ सातवसे, अंगणवाडी कर्मचारी सभा जिल्हा अध्यक्ष इम्रान कुरेशी, चिमूर प्रेसचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, सामाजीक कार्यकर्ता निखील कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर आदी उपस्थित राहनार आहे.

या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ रंगकर्मी पिपर्डा येथील स्व. यशवंत पाटील बोरकर, रत्नापूर चे श्रीधर पाटील लोधे, नवरगाव चे विदर्भ रत्न पुरस्कार प्राप्त सदानंद बोरकर, सिंदेवाही चे प्रा.शेखर डोंगरे, स्व.गिताचंद्र चंद्रगीरीवार, जांभूळघाट चे शेरू खान, शबाना खान, भद्रावतीच्या सुलभा दुपारे, पिपर्डाचे बु. आनंदराव चुनारकर, स्व. उद्धव पाटील बोरकर, मनोहर पाटील बोरकर, केशव पाटील बोरकर, विश्वनाथ दऊलवार, देविदास पेंदरे, स्व. श्यामराव कोडापे, ग्यानीवंत मेश्राम, स्वदादाजी पाटील बोरकर, दुर्योधन चव्हान, देवराव खोब्रागडे, स्व. कुशाल कावळे, दादाजी भेंडारे, दुशांत तागडे, ज्ञानेश्वर मेश्राम आदीचा सत्कार होनार आहे.

दरम्यान सायंकाळी प्रदीप सुकारे लिखीत व ज्ञानेशकुमार दिग्दर्शीत तिन अंकी नाटय बाळा गाऊ कशी अंगाई या नाटय कलाकृतीचे उध्दघाटण माजी अध्यक्ष जि.प. चंद्रपूर तथा सदस्य सतिश वारजूकर व सहद्धघाटण धान्य व्यापारी भारत भेंडे, वनरक्षक सातपुते करनार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर, उपाध्यक्ष इम्रान करेशी, विशेष अतिथी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कलीम शेख, सामाजीक कार्यकर्ता आशिफ शेख, स्मीत निकुरे, सुरजागडे, लोखंडे, दांडेकर, आमगवार, गेडाम, नानाजी नागोसे, चरणदास कळाम आदी उपस्थित राहनार आहेत. या कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांनी उपस्थीत राहन्याचे आवाहन ग्रामशक्ती युवा विचार मंच पिपर्डा यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button