Amalner

सबगव्हाण येथील अंगणवाडी चे कुलूप तोडून एलईडी टीव्ही चोरीस..

सबगव्हाण येथील अंगणवाडी चे कुलूप तोडून एलईडी टीव्ही चोरीस..

अमळनेर येथील सबगव्हाण अंगणवाडीचे कुलूप उघडून १५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना तालुक्यातील सबगव्हाण येथे १ ते ३ नोव्हेंबर
दरम्यान घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंगणवाडी मदतनीस मंगलबाई रवींद्र पाटील या १ नोव्हेंबर रोजी अंगणवाडीला कुलूप लावून गेल्या होत्या. ३ रोजी
संध्याकाळी साडे पाच वाजता ग्रामपंचायतीचा शिपाई योगेश पाटीलने अंगणवाडीचे कुलूप उघडे असलेले पाहिले त्यामुळे अंगणवाडी सेविकेला कळवून खोली उघडून पाहिली असता त्यात एलईडीटिव्ही चोरीस गेल्याचे आढळून आले. मारवड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हेडकॉन्स्टेबल सुनील तेली तपास करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button