Amalner

??ठोस प्रहार चा दणका .. नदी पात्र झाले खाली …सट्टा, जुगार,आणि दारू पिणाऱ्यांपासून बोरी माईंची मुक्तता

ठोस प्रहार चा दणका ..नदी पात्र झाले खाली …सट्टा, जुगार,आणि दारू पिणाऱ्यांपासून बोरी माईंची मुक्तता..पोलीस प्रशासनाचे आभार

योगेश पवार

अमळनेर येथील बोरी नदीच्या पात्रात रोज संध्याकाळी गर्दी होत होती.लहान मुले क्रिकेट खेळत असत तर तरुण मंडळी पत्ते, जुगार,सट्टा,दारू इ अवैध धंदे सुरू होते. कोरोना च्या प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन मेहनत घेत आहे. लोकांनी सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करावा, हँड वॉश चा उपयोग करावा तसेच 144 कलम लागू असल्याने संचारबंदी सुरू आहे. एका ठिकाणी अनेक लोक एकत्रित येऊ शकत नाही. यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासना बरोबरच तालुका प्रशासन कार्यरत आहे.

??ठोस प्रहार चा दणका .. नदी पात्र झाले खाली ...सट्टा, जुगार,आणि दारू पिणाऱ्यांपासून बोरी माईंची मुक्तता

या अनुषंगाने ठोस प्रहारने बोरी नदी वरील या सर्व प्रकारची बातमी प्रकाशित केली होती. तसेच पोलीस प्रशासनाला भ्रमणध्वनी द्वारे कळविले होते. ठोस प्रहारच्या बातमी मुळे प्रशासन सजग झाले आणि बोरी नदी पात्रा तील वरील प्रकार बंद झाले आहेत.आणि बोरी माईने मोकळा श्वास घेतला आहे. याबद्दल ठोस प्रहारच्या वतीने पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,पो ना शरद पाटील यांचे आभार व्यक्त करत आहोत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button