आरोग्य सेविका अश्विनी भांडवल यांनी त्यांच्या पतीचा वाढदिवस मास्क व सँनिटायझर वाटून केला साजरा
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि. ०४
परंडा तालुक्यातील आरोग्य सेविकेने पतीचा वाढदिवस मास्क व सँनिटायझर वाटून साजरा केला व माणुसकीचे दर्शन घडविले. आज कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेविका अश्विनी भांडवल यांनी घरापेक्षा समाज महत्त्वाचा आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
खरचं अशा माऊलीचे सर्वांनकडून कौतुक होत आहे. आपल्या कूटूबांची काळजी न करता कोरोनाचा प्रादूभाव रोखण्यासाठी २४ तास देशाची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना प्रोत्साहात देण्यासाठी आज ४ मे रोजी परंडा तालूक्यातील मौजे.आसू येथील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेविका अश्विनी भांडवलकर यांनी मास्क , सँनिटायझरच वाटप केले आहे.
पतीच्या वाढदिवसानिमित्त आज सँनिटायझर व मास्कचे वाटप पोलीस ठाणे परंडा व उपजिल्हा रूग्णालय परंडा येथील कर्मचारी यांना करण्यात आले.
यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद , सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव राठोड, पोलीस कर्मचारी जगताप (मामा), आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच आरोग्य सेविका अश्विनी भांडवलकर,दयानंद भाडवलकर, राजेश गोरे.आदी कर्मचारी उपस्थीत होते.
याचे सर्व नागरीकातुन कौतुक होत आहे.






