Amalner

?️अमळनेर कट्टा… केंद्र सरकारच्या रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन…

?️अमळनेर कट्टा… केंद्र सरकारच्या रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन…
वरील विषयास अनुसरून केंद्र सरकारच्या रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल
व गॅस दरवाढ ही दुप्पटीने झालेली आहे. एकीकडे दोन हजाराची मदत शेतकऱ्यांना
करणे व दुसरीकडे दोन्ही हातांनी खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना लुबाडणे
शेतकऱ्यांचा शेती व्यवसायासाठी लागणारे रासायनिक खते यांचा दरवाढ
झाल्याने शेतकरी अजून तोटयात जाणार तसेच सर्व सामान्य जनतेसाठी व दळणवळण साठी लागणारे पेट्रोल व डिझेल याची देखील किंमती जवळ पास प्रति लिटर १००/ रुपये गाठीत आहे. यामुळे सर्व सामान्य जनता देखील त्रस्त झालेली आहे. दैनंदिन कुटूंब चालविणारे सर्व सामान्य व्यक्तींना आजची गॅस वाढ ही न परवडणारी नसून सर्व सामान्य माणसांचे आर्थिक जीवन विस्कळीत झालेली आहे.कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन मुळे सर्व व्यवसाय हे ठप्प झालेले आहेत त्यात हे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ म्हणजेच सर्व सामान्य जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहेत किंवा लावणेसारखे आहे.
अशा केंद्र सरकारच्या जुल्मी धोरणा विरोधात निवेदन सादर वरील
सर्व दरवाढ त्वरीत कमी करण्यात यावे व सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यात
यावा ही नम्र विनंती. अन्यथा भविष्यात केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतर शिवाय पर्याय राहणार नाही असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
यावेळी सचिन पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,मुक्तार खाटीक शहर अध्यक्ष रा काँग्रेस,संजय पाटील,शिवाजी पाटील,एल टी पाटील,जितेंद्र राजपूत,विजय पाटील,रणजित पाटील,भागवत पाटील,सुरेश पाटील इ पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button