चोपडा येथे हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न…
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त त्याच्या पावन स्मृतीला चोपडा येथे अभिवादन करण्यात आले. चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी, तसेच चोपडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, गटनेते, उपनगर अध्यक्ष, विकास आघाडीचे नगरसेवक, शिवसेना कार्याकर्ते, शिवसैनिक, बाळासाहेब सर्मथक, व इतर नागरीक उपस्थित होते.






