Pandharpur

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सिद्धेश्वर अवताडे यांना उत्तम प्रतिसाद

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सिद्धेश्वर अवताडे यांना उत्तम प्रतिसाद

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत युवक नेते सिद्धेश्वर आवताडे यांनी दंड थोपटले असून या निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर आवताडे यांना मोठ्या प्रमाणात मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळत असून अनेक संघटनेकडून त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कारण बबनराव आवताडे यांनी सामाजिक कार्याची जाणीव ठेवून मंगळवेढा येथील कायम दुष्काळी भागात सर्वसामान्य शेतमजूर,शेतकरी,कॉलेज युवक यांना मागेल तेव्हा मदत करणे,अडचणीच्या काळात धावून
जाणे,मंगळवेढा शहरात आल्यानंतर त्यांना विविध कामासाठी मदत करणे या आणि अश्या प्रकारच्या अनेक सामाजिक कार्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे आणि या सर्व गोष्टींचा फायदा बबनराव आवताडे उर्फ बप्पा यांचे सुपुत्र सिद्धेश्वर आवताडे यांना पोटनिवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. सिद्धेश्वर आवताडे यांना मिळत असलेल्या पाठिंब्याची चर्चा व सभेला होणारी गर्दी पाहता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेतील प्रत्येक गावातील चावडी कट्ट्यावर युवक नेते सिद्धेश्वर आवताडे यांची चर्चा रंगू लागली असुन एकंदरीत पाहता मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात “बप्पा बोले अन् मंगळवेढा तालुका हाले” असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दुसरीकडे युवक नेते सिद्धेश्वर आवताडे यांनी ग्रामीण भागातील युवक मंगळवेढा शहरांमध्ये शिकण्यासाठी किंवा तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालयात काही कामानिमित्त आल्यानंतर त्या युवकाला मदत करणे किंबहुना एक ना अनेक प्रश्नासाठी ग्रामीण भागातील युवकांना शहरात आल्यानंतर सामोरे जावे लागत होते.या युवकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात पुढे होऊन सोडविण्याचे काम युवक नेते सिद्धेश्वर आवताडे यांनी केले असून एक प्रकारे युवकांच्या गळ्यातील ताईत सिद्धेश्वर आवताडे बनलेले आहेत या सर्व गोष्टींचा फायदा त्यांना होणार आहे..आज सद्यस्थितीला ग्रामीण भागातील युवक सिद्धेश्वर आवताडे हे आपल्या घरातील उमेदवार आहे असे समजून होम टू होम प्रचार करताना मंगळवेढ्यातील ग्रामीण भागात पाहताना मिळत आहेत; एकंदरीत या सर्व गोष्टींचा फायदा सिद्धेश्वर आवताडे यांना पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात होणार असून सहाजिकच त्यांना या सर्व गोष्टींची मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button