Latur

जिल्हाधिकारी कार्यालयात जी. श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात जी. श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण

लातूर प्रतिनिधी :- प्रशांत नेटके

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहन कार्यक्रमाकरिता लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रदिप कुलकर्णी , उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एस. दुशिंग यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
जूने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या शुभ हस्ते सकाळी ८:२० ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश बारगजे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषि उपसंचालक राजकुमार मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक बाबासाहेब संगनवार, विशेष लेखा परिक्षक उमाकांत पवार, जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिशन राऊत, अप्पर कोषागार अधिकारी श्री.कुलकर्णी यांच्यासह प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button