Parola

राजवड जि. प. शाळेची जिल्हास्तरावरून तंबाखू मुक्त शाळा म्हणून निवड

राजवड जि. प. शाळेची जिल्हास्तरावरून तंबाखू मुक्त शाळा म्हणून निवड

कमलेश चौधरी पारोळा

पारोळा : जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जळगाव वआरोग्य विभाग पारोळा यांच्यावतीने येलो लाईन मोहिमेअंतर्गत राजवड आदर्शगाव तालुका पारोळा येथील जि. प. शाळेची तंबाखू मुक्त शाळा म्हणून निवड करण्यात आली. राज्यभरात तंबाखू मुक्त अभियान राबविले जात आहे. यात विविध संस्था व शाळांच्या सहभाग आहे.

विविध स्तरावर तंबाखू मुक्ती साठी जनजागृती व सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात येलो लाईन मोहिमेत राजवड येथील जिल्हा परिषद शाळेची निवड झाली. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जळगांव यांनी निवड केली. याबद्दल शाळेच्या प्रवेशद्वारावर पिवळ्या रेषा ओढून तंबाखू सेवन खरेदी व विक्रीस प्रतिबंध क्षेत्र म्हणून सूचना लावण्यात आली. श्रीमती कविता सुर्वे गटशिक्षणाधिकारी पारोळा, डॉ. प्रांजली पाटील तालुका मेडिकल ऑफिसर, त्यांच्या मार्गदर्शनाने डॉ. पाकीजा पटेल यांनी मोहीम यशस्वी करण्याचे सुतोवाच दिले. याप्रसंगी मुख्याध्यापिका डॉ. पाकीजा पटेल डॉ.पटेल सर ,मनोज चिंचोरे तज्ञ शिक्षक, राज मोहम्मद खान शिकलकर जिल्हा तंबाखू समन्वय समिती, किरण बारी, वैशाली बोरसे, अनिल पाटील आरोग्य सेवक, मनोज चौधरी ,हर्षल पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button