अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी व पिडीतांचे तात्काळ पुनर्वसन करा भीम आर्मीची मागणी..
लक्ष्मण कांबळे
गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातींच्या नागरीकांवर हल्ल्याच्या 28 घटना घडल्या आहेत. जातीय द्वेषातून तरूणांचे खुन झालेले आहेत. अनेक जण जायबंदी झाले आहेत पोलीस आधिकारी गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब लावतात म्हणून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ( अॅट्रासिटी) अॅक्ट ची तात्काळ अंमलबजावणी करून पिडीत कुटूंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. त्यांना तातडीने अर्थिक मदत व कुटूंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत घेण्यात आले पाहिजे.
अन्यायग्रस्त कुटूंबास तातडीने गृहविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी भेट देऊन आधार दिला पाहिजे.
अॅट्रासिटीचे सर्व खटले विशेष सरकारी वकीलांमार्फत जलदगती न्यायालयात चालवावेत.पिडीत कुटूंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे.
खुन खटल्यात सरकारी साक्षीदार घ्यावेत.आणी टिकटाॅक सोशल मिडियावर अनुसूचित जाती जमातींच्या नागरीकांवर अश्लील भाषेत पोस्ट करणा-या व महापुरूषांची बदनामी करणा-या समाकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागण्याही उत्तरेश्वर कांबळे यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या आहेत..






