एसपी श्री.उगले,नवटक्केंयांनी जिल्ह्यातून बाहेर पाय काढताच बिळातील अवैध धंदेवाईक रस्त्यांवर शासकीयकार्यालयां प्रमाणे चालताय पत्त्यांचे क्लब सट्टा पेढ्या विना परवाना गावठी बनावट देशी विदेशी दारुचा गल्लीबोळात महापुर
मुबारक तडवी जळगांव
Jalgaon : जळगांव जिल्ह्यातील अवैध धंदेवाईक दारु,सट्टा पत्ता, व्यावसायिकांना पळता भुई कमी पाडणार्या तसेच नुस्त्या नावानेच अवैध धंदेवाईक व अधिकारी यांना थरकाप आणणार्या जळगांव जिल्ह्यातील तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री.भाग्यश्री नवटक्कें यांची बदली झाली असून त्यांनी जळगांव जिल्हयातून पाय बाहेर काढताच बिळात डोकी लपवून बसलेले अवैध धंदेवाईक दोननंबरी बिनबोभाट रस्त्यावर अवतरली आहेत पोलिसांचा काही एक धाक दबदबा राहिला नसल्याचे स्पष्ट चित्र सध्या पाहावयास मिळत आहे जिल्ह्यातील अनेक गावागावात अवैध धंदे राजरोस पणे बिनदिक्कत सुरू आहेत राजा राणी गुलाम एक्क्याच्या पत्त्यांचे क्लबसह कल्याण, वरली,मिलन डे नाईट ताप्तीगंगा या सट्टा मटका चे अड्डे शासकिय कार्यालयांप्रमाणेच रात्रंदिवस अविरत शासकीय कार्यालयांसारखेच अड्डे व सट्टा पेढ्या थाटल्या आहेत एकतर वर्षभरापासून कोरोनाचा हाहाकार बुडालेले रोजगार व असह्य झालेली बेरोजगारी यामुळे सट्टा मटका,पत्ता,दारु यांचे अंगीजडलेले शौक यामुळेच तर चोरींच्या प्रमाणात वाढ झाली असावी का ?? हा प्रश्न ही समोर येत आहे तसेच शासनाच्या पुर्व परवानगीने शासनास उत्पन्न मिळावे याकरिता वाईनशॉप्स,बियर बार सुरू झालेत मात्र परवाना धारक विक्रेत्यांच्या चारपटीने विना परवाना गावठी सह देशी विदेशी दारू जिल्ह्यात अनेक गावांत बेकायदा विनापरवाना , हॉटेल्स,ढाबे व गावागावात, चौकाचौकातील गल्लीबोळात राजरोसपणे पाऊसपन्नी,कॉटर,च्या माध्यमातून बिनधास्त विक्री केली जात आहे जणू या अवैध धंदेवाईकांना कुणाचा धाक दराराच राहीला नसल्याचेही या बिनबोभाटपणे विकल्या जाणार्या अवैध दारू विक्रीतून दिसत आहे जळगांव जिल्हयाचे तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले ,अप्पर पोलिस अधीक्षक ईशुसिंधू,श्री.भाग्यश्री नवटक्कें यांनी अवैध धंदे वॉश आऊट केले होते अवैध धंदेवाईकांना थरकाप भरवित सळोकी पळो करून सोडले होते सर्व अवैध धंदेवाईक भूमिगत होऊन बिळांत लपलेले होते मात्र कार्यकाळ पूर्ण झाल्याने या कर्तव्यदक्ष अधिकार्याच्या बदली झाली व आता रानमोकळे झाल्याचे चित्र सध्या तरी बघावयास मिळत आहे मात्र जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे दोन महिन्यांपूर्वी हाती घेतलेले कर्तव्यदक्ष कार्यक्षम कर्मनिष्ठ शिस्तप्रिय श्री. डॉ प्रविण मुंडे,उप अधिक्षक कुमार चिंथा यांना ह्या बोकाळलेल्या सट्टा मटका ,पत्ता,, गावठी,देशी, विदेशी आदी अवैध धंदेवाईकांना पायबंद घालण्यास यश येईल का? या अवैध धंदेवाईक व्यावसायिकांची उफाळलेली डोकी अवैध धंदे वॉश आऊट मोहीम राबवून पुन्हा बिळात घालतील का ? अशी अपेक्षा जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे






