Pandharpur

द.ह.कवठेकर प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

द.ह.कवठेकर प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेत मार्च 2020 साठी प्रविष्ट विद्यार्थ्याचा निरोप समारंभ संपन्न झाला. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यपक श्री.प्र.गो.डबीर यांनी प्रास्ताविक केले.पर्यवेक्षक श्री.वि.या.पाटील यांनी परिक्षेसंबंधी सूचना दिल्या. प्रातिनिधिक स्वरूपात प्रशालेतील विद्यार्थी कु.नंदिनी वैद्य, कु. आर्या मिसाळ, कु. सानिका चव्हाण, कु.श्रुती सुतार, कु.श्रावणी पतकी व चि. सुबोध कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

द.ह.कवठेकर प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

या प्रसंगी उपमुख्याध्यापक श्री.द.शि.तरलगट्टी, सौ. सीमा चिंचोळकर,यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. वर्गशिक्षक श्री. दिवाण स.सु. श्री. खिस्ते रा.र. , सौ. एस.आर.कुलकर्णी व श्री.राजेश काकडे सर यांनी परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. श्री.एस.एम.कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button