Amalner

अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोरोनो विषाणू पासून बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा- तहसीलदार मिलींदकुमार वाघ

अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोरोनो विषाणू पासून बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा-
तहसीलदार मिलींदकुमार वाघ

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत
आहे की, कोरोना विषाणू (COVID-19) च्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे
वातावरण निर्माण झालेले आहे. तथापि, जळगाव जिल्हयात कोरोना विषाणूचा एकही
रुग्न आजरोजी आढळून आलेला नाही. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. नागरिकांनी
दररोज सकस आहार, व्यायाम व आरोग्याची काळजी घेतल्यास या विषाणापासून बचात
करता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

1. आपले हात वारंवार साबणाने/ हॅण्डवॉशने स्वच्छ धुवा, आपला हात वारंवार नाक,

तोंड यांना लागणार नाही याची काळजी घ्या.
2. खोकलताना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा, खोकला किंवा सदी झालेल्या

व्यक्तीपासुन दुर रहा. अशा व्यक्तींशी हातमिळवणी टाळा व भारतीय पध्दतीने
नमस्कार करा.
3. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर धुंकू नका, दररोज किमान ४ लिटर पाणी प्यावे,पुरेशी झोप घ्यावी.

4. पुर्ण शिजवलेले अन्न, फळभाज्या व पुर्ण शिजवलेले मांस खावे, कच्चे मांस खाऊ नये.

5. आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांपासुन दुर रहा.

6. सदी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास, डोकेदुखी, उलटया व जुलाब, घसा तीव्रतेणे

दुखणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ मान्यताप्राप्त डॉक्टरांना संपर्क साधा व उपचार करून घ्या.

7. सोशल मिडीयावरील अफवांवर, अवैद्यकीय उपचारांवर विश्वास ठेवू नका, चुकीचे संदेश पसरवु नका, चुकीचे संदेश सोशल मिडीयावर प्रसारित केल्यास संबंधीता
विरुध्द कायदेशीर कारवाई होवु शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी.

8. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जावु नका, तसेच गर्दी होऊ शकतील असे सार्वजनिक
___समारंभ शक्यतो आयोजित करु नका.

9. घरातील लहान मुले, वयोवृध्द व्यक्ती, गरोदर माता यांची विशेष काळजी घ्यावी.

10. कोरोना विषयक लक्षणे आढळून आल्यास राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष

020-26127394, टोल फ्री क्र. 104, राष्ट्रीय कॉल सेंटर क्र +91-11-23978046
या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button