यावलचा पो.स्टेचा फरार आरोपी सावदा पोलीसांच्या जाळ्यात..
मुबारक तडवी यावल
यावल : आज दि .२५ / १२ / २०२० रोजी सायंकाळी सावदा शहरात इसम नामे . सलीम सिकंदर तड़वी , रा.परसाडे ता.यावल हा बसस्थानक परीसरात सार्वजनिक ठिकाणी काही एक कारण नसतांना मोठ मोठ्याने आरडा ओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतांना मिळुन आल्याने त्यास सावदा पोलीसांनी ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचेवर मुंपो.का.क .११२ / ११७ प्रमाणे कारवाई केली . सदर आरोपी कडेस सखोल विचारपुस करता तो यावल पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भाग -५ गुरन १५ ९ / २०२० भादवि कलम -४२० प्रमाणे दाखल अपराधातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न इ पाल्याने सदर आरोपीतास यावल पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे . सदरची कारवाई ही मा.सपोनि श्री.उणवने सो यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि , आर डी पवार , पोहेका .१२८४ सपकाळे , पोना .२७८२ पिंजारी , पोना .२४७२ संजीव चौधरी , पोना .३०६२ सुरेश अढायगे , पोका .२१० ९ विशाल खेरनार यांनी केली आहे .






