Paranda

नेहरू युवा केंद्राकडून व्हाट्सएपच्या माध्यमातून जनजागृती 

नेहरू युवा केंद्राकडून व्हाट्सएपच्या माध्यमातून जनजागृती

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि. २९

नेहरु युवा केंद्र धाराशिव ( भारत सरकार) यांच्या नेतृत्वाखाली सोशल मीडिया मार्फत कोरोना संसर्ग जनजागृती कार्य सुरू आहे.संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नेहरू युवा केंद्र यांच्या मार्फत व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना संसर्ग विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.याप्रमाणेच नेहरू युवा केंद्र परंडा तालुक्यातील व्हाट्सएप ग्रुपमधून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.या व्हाट्सएप ग्रुपची दिवसेंदिवस वाढलेली सहभागी संख्या यामध्ये प्रशासकीय अधिकारी,पोलीस, डॉक्टर,ग्रामसेवक,वकील,शिक्षक,

पत्रकार,विविध सेवाभावी संस्था पदाधिकारी, शेतकरी मित्र,परंडा तालुक्यातील युवा मंडळे जोडली जात आहे.यामध्ये आतापर्यंत ७०० नागरिकांनपर्यंत व्हाट्सएपच्या माध्यमातून कोरोना जनजागृती, माहिती,प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

समाजामध्ये चुकीची माहिती पसरू नये व अफवा यांना आळा बसेल तसेच प्रशासनाच्या नियमांचा आदर करत ,संचारबंदीचे उल्लंघन न करता सोशल मीडिया मार्फत कोरोना संसर्ग जनजागृती कार्य सुरळीत चालू राहील हाच खरा उद्देश नेहरू युवा केंद्राने समोर ठेवून हा सोशल मिडिया जनजागृती उपक्रम राराबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्र परंडा व्हाट्सएप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी ९७६७३७३५०५ या क्रमांकावर आपलं नाव टाकून NYK असा एसएमएस करा,कोरोना विषयी अधिकृत माहिती सर्वत्र पाठवू, कोरोना हद्दपार करू असा संदेश दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button