Chalisgaon

करगाव, इच्छापूर व चैतन्य तांडा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार…

करगाव, इच्छापूर व चैतन्य तांडा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार…आमदारांच्या सत्कार व भेटीने भारावले लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ, गावाच्या विकासाची दिली हमी…करगाव, इच्छापूर व चैतन्य तांडा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार...

मनोज भोसले

गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यातील करगाव ग्रुप ग्रामपंचायत विभाजन व्हावे अशी मागणी होती. नुकतेच सदर ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन नवीन सरपंच व सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे करण्यात आली. या सर्व नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. गावाच्या विकासासाठी गट – तट – पक्षभेद विसरून सर्वांनी एकदिलाने काम करावे, त्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची मदत मी करेन असे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले. आमदारांच्या या सत्काराने व भेटीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ भारावले.करगाव, इच्छापूर व चैतन्य तांडा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार...यावेळी चैतन्य तांडा क्र.४ (चैतन्य तांडा ग्रामपंचायत) सरपंच सौ अनिता दिनकर राठोड, करगाव तांडा क्र.१,२,३ (इच्छापूर ग्रामपंचायत) सरपंच सौ.कल्याणी निलेश राठोड, करगाव ग्रामपंचायत सरपंच सौ.अर्चना किरणसिंग देवरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा त्यांनी सत्कार केला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल चव्हाण, राम पाटील, सागर सूर्यवंशी यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button