ना स्वार्थासाठी! ना राजकारणासाठी! फक्त पाण्यासाठी !!!
जलपरिषद जागृती कार्यक्रमाचे आयोजन
सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे
सकाळ वृत्तसेवा पत्रकार , जलमित्र आणि आदर्श व्यक्ती मा .श्री.रतन चौधरी सर, सुरगाणा यांनी जलपरिषद चळवळ हि सामाजिक चळवळ म्हणून उभी राहावी यांसाठी मोठे योगदान देत आहेत . आदिवासींच्या समस्या /अडीअडचणी सोडविण्यासाठी धाऊन जाणे आणि त्या सुटेपर्यंत त्याचा छडा लावणे हा छंद जोपासणाऱ्या , माणुसकी दाखवत प्रसंगी लोकप्रतिनिधीं आणि नोकरदार यांवर वचक ठेवणाऱ्या श्री रतन चौधरी सरांचे पाणी तसेच इतर मूलभूत समस्या यांवर रंजक पण मार्मिक व्याख्यान 19 जानेवारी 2020 रोजी मालगव्हान ता सुरगाणा जिल्हा नाशिक येथे आयोजित केले आहे .
तसेच प्रशिक्षित व प्रवीण जलदुत श्री.योगेशजी गावित यांचेही पाणी वाचवा यावर अनोख्या अंदाजात व्याख्यान आहे .राजकारण बाजूला ठेऊन मा.श्री नितीनजी पवार, आमदार स्वतः आपल्या भेटीला येत असून त्यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे . शिवाय मतदार संघातील लोकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत
या दुर्मिळ योगाचे साक्षीदार होण्यासाठी त्रंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या चारही तालुक्यातील तरुण युवक-युवती , सरपंच , पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामसेवक आणि शिक्षक यांनी या कार्यक्रमात यावे ही विनंती .
ना स्वार्थासाठी! ना राजकारणासाठी! फक्त पाण्यासाठी !!!






