Pandharpur

ओबीसी समाजाच्या मोर्चास सोलापूर जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार – शरद कोळी

ओबीसी समाजाच्या मोर्चास सोलापूर जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार – शरद कोळी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर येत्या 24 जानेवारी रोजी जालना येथे काढण्यात येणारा अठरापगड बलुतेदार ओबीसी समाजाचा विशाल मोर्चास सोलापूर जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती धाडस संघटनेचे अध्यक्ष व ओबीसी जनमोर्च्यांचे युवक प्रदेशाध्यक्ष शरद कोळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यासह भारतातील संपुर्ण ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य् मागण्यांकडे राज्य् व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जालना येथे दि. 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर शरद कोळी यांनी सर्वाना आवाहन केले असून सोलापूर जिल्ह्यातून पाच हजार अठरापगड बलुतेदार समाज बांधव कार्यकर्ते घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे.
शरद कोळी बोलताना म्हणाले की,अठरापगड बलुतेदार ,ओबीसी समाजाच्या व्यथा मांडुन यासर्व समस्या मार्गी लावण्या बरोबरच ओबीसी समाजाची देशभरात जनगणना होणे का आवश्यक आहे? याचे महत्व् सांगितले आहे.
ओबीसी समाजाची जनगणना झाल्या शिवाय प्रगतीच्या वाटा उघडणार नाही. भावी पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातुन जनगणना होणे अत्यंत गरजेचे असुन ही जनगणना व्हावी यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत शरद कोळी यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button