Dhule

? नवनियुक्त भाजापाच्या जिल्हा उपाध्यक्षा सोनिया पावरा यांचा सत्कार

? नवनियुक्त भाजापाच्या जिल्हा उपाध्यक्षा सोनिया पावरा यांचा सत्कार

राहुल साळुंके

केवळ स्वत:च्या राजकिय मुत्सद्देगिरीमुळे ग्राम पातळीवरून ते जगातील सर्वाधिक मोठ्या राजकिय पार्टी असलेल्या भारतीय जनता पार्टी च्या धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी (ग्रामीण) नियुक्त झालेल्या कोडीद गावाच्या विद्यमान सरपंच मा. श्रीमती सोनिया भारत पावरा यांची आज बिरसा क्रांती दलाच्या वतीने सदिच्छा भेट घेवून, सत्कार करण्यात आला. समाजातील महिलेला मिळालेले हे महत्वपूर्ण पद समाजासाठीही अभिमानास्पद असेच आहे.

तसेच जनतेच्या विविध समस्या, गाव पातळीवरील विविध समस्या, शैक्षणिक, आरोग्य, पाणी अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मा. श्रीमती सोनिया पावरा यांनी लोकांच्या समस्या प्रशासनापुढे मांडून सोडवून देईन असे आश्वासन दिले. यापूर्वी सोनिया पावरा यांनी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा वनसमिती सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य आदी महत्वपूर्ण पदांवर यशस्विरीत्या जबाबदारी पार पाडलेली आहे.

सोनिया ताईंना भावी राजकीय वाटचालिस खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बिरसा क्रांती दलाचे विभाग प्रमुख व अध्यक्ष मा. मनोज पावरा, मा. वसंत पावरा जिल्हा महासचिव धुळे, मा. विलास पावरा जिल्हा सल्लागार धुळे व मा. गेंद्या पावरा तालुका सचिव शिरपूर, कोडीद चे पोलिस पाटील मा. भारत पावरा, सामाजिक कार्यकर्ते मा. कांतिलाल पावरा आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button