Ausa

विना मास्क प्रवास करुन अँटी कोरोना फोर्स सोबत हुज्जत घालणार्‍या इसमांविरुद्द औसा तालुक्यातील पहिला गुन्हा दाखल

विना मास्क प्रवास करुन अँटी कोरोना फोर्स सोबत हुज्जत घालणार्‍या इसमांविरुद्द औसा तालुक्यातील पहिला गुन्हा दाखल

औसा लक्ष्मण कांबळे

तालुक्यातील जवळगा पो. येथे अँटी दिनांक 25 एप्रिल 2020 वार शनिवार रोजी सकळी कोरोना फोर्स च्या स्वयं सेवक यांना
हरे गाव येथील बालाजी डोंगरे व शरद कोव्हाळे या दोन तरुणांनी तोंडाला मास्क न बांधता प्रवास करताना असताना अडविले असता सदर दोन्ही तरुणांनी अरेरावी करत स्वयंसेवक यांना जीवे मारण्याची धमकी दिली या वरून जवळगा येथील ग्रामसेवक डी. एच. शहापूरे यांच्या फिर्यादी वरून किल्लारी पोलीस स्टेशन येथे मा. ज़िल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कोविड 19 उपाय योजना कायदा 2020 कलम 2, 3, 4, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा भादवि 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अमोल गुंडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड का.उस्तूर्गे तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button