Amalner

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारा साठी लोकशाही बचाव नागरी कृती समितीची सभा शांततामय वातावरणात होणारच

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारा साठी लोकशाही बचाव नागरी कृती समितीची सभा शांतता मय वातावरणात होणारच

अमळनेर

अमळनेर येथे भारत,संविधान, लोकशाही या विषयावर संविधानातील कलम १९ प्रमाणे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराने सभेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय वक्ते योगेंद्र यादव, आ.जिग्नेश मेवानी,भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी नेते उमर खालिद यांची सभा सनदशिर मार्गाने लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने शांततामय वातावरणात संपन्न होणार आहे. अमळनेरातील संविधान प्रेमी ,राष्ट्र प्रेमी अभ्यासू नागरिकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय स्तरावरील वक्त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.

हम भारत के लोग या अंतर्गत राष्ट्र पातळीवर विविध संविधान जागरणाचे कार्यक्रम मालिका सुरू आहे.अमळनेर येथे लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जनजागृती सभेला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोधाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम जोरदार चर्चेत आलेला आहे. तर अमळनेर पोलिसांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोट कलम १ व३ चे अनुषंगाने जिल्हयात जिल्हा प्रशासनाने ६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असल्याचे कार्यक्रमास परवानगी नाकारली असल्याचे पत्र आयोजकांना दिले आहे.तर आयोजकांनी संविधान विषयावरील कार्यक्रमास विरोध करणे हे संविधान विरोधी असल्याचे म्हटले आहे. लोकशाही बचाव तर्फे पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदन दिले असून सोशल मीडियावर होणारा अपप्रचार व चिथावणीखोर वक्तव्य प्रसिद्ध करून संविधानिक व्यक्ती व भाषण स्वातंत्र्यावर बाधा आणनेचा गंभिर स्वरूपाचे फौजदारी गुन्ह्यास पात्र गैरकृत्य चालविले आहे असे नमूद करून सदरच्या भारत संविधान लोकशाही या राष्ट्रीय विषयावरील चर्चा सत्रास मनाई करून भारतीय नागरिकांसह मागासवर्गीय अल्पसंख्याक घटकांच्या भावना दुखावून अनादर करू नये.कायद्याच्या दुरुपयोगाने प्रतिबंध लादणेत येऊ नये अशी विनंती करण्यात आलेली आहे. पत्रकावर डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदानशिव ,संविधान बचाव कृती समितीचे अमळनेर संयोजक प्रा अशोक पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक,महाराष्ट्र रिपब्लिकन पॅथरचे महाराष्ट्र सेक्रेटरी गौतम सपकाळे,लोकशाही बचाव नागरी कृती समितीचे ऍड शकील काझी,ऍड रणजित बिऱ्हाडे, आदिवासी पारधी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे,सामाजिक कार्यकर्त्या भारती गाला,गावरान जागल्या सेनेचे विश्वास पाटिल, युथ सेवा फाउंडेशन चे रियजोद्दीन शेख,बहुजन क्रांती मोर्चा चे रणजित शिंदे,अल्पसंख्याक विभाग काँग्रेस कमिटीचे विभागीय अध्यक्ष रज्जाक शेख,सुन्नी दारूल कझा चे फय्याज पठाण,सामाजिक कार्यकर्ते सत्तार अ रमजान,नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी, नगरसेवक फिरोज खान पठाण आदिंची स्वाक्षरी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button