Pandharpur

पंढरपुरात शेतकरी आक्रमक..मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी…

पंढरपुरात शेतकरी आक्रमक..मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी…

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कृषी कायद्या विरोधात पंढरपुरातील शेतकर्यांनी आज आक्रमक होत आक्रोश व्यक्त केला.पंढरपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाशतात्या पाटील सह, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिव सेना, बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात निदर्शने केली.तसेच आज भारत बंद पुकारण्यात आले होते.या बंदला पंढरपूर शहरातून कडकडीत बंद पाळण्यात आला.पंढरपूर बाजार समितीमधील देखील बंद असल्याने सर्व व्यापार्यांनी बंदला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवले.
मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करत. सरकार विरोधात घोषणाबाजी केली. जवळपास एक तासभर आंदोलन केले . नवे कायदे शेतकर्याना उद्योगपतीच्या दावणीला बांधणारे आहेत.असे कायदे करून सरकारने वार्यावर सोडल्याची टीका केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button