शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण समारंभ
सलीम पिंजारी
कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत रावेर तालुक्यातील खानापूर येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2019-20 अंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पिकावरील समूह पंक्ती प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे.एकूण २५ एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. त्यानिमित्त शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.या प्रसंगी लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे,बीजप्रक्रिया साठी जिवाणू खते, कीडनियंत्रणासाठी कीडनाशके तसेच पिवळे चिकट सापळे निविष्ठा म्हणून वाटप करण्यात आले.कार्यक्रम अध्यक्ष के व्ही के चे प्रभारी प्रमुख श्री.संजय महाजन उपस्थित होते,कमी खर्चातील तंत्रज्ञान अवगत करून अधिक उत्पादन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.तांत्रिक मार्गदर्शन करतांना श्री.महेश वि महाजन (शास्त्रज्ञ- पीक सरंक्षण) यांनी हरभरा पीक लागवड, सुरक्षित कीडनाशके फवारणी व कीड रोग बाबत माहिती दिली. या प्रसंगी व्यासपीठावर श्री. डॉ.धीरज नेहेते,श्री.प्रमोद सरोदे तसेच लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज कोळी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.




