Jalgaon

अवयवदान हि तर काळाजी गरज डॉ नरेंद्र ठाकूर

अवयवदान हि तर काळाजी गरज
डॉ नरेंद्र ठाकूर

जळगांव
अमळनेर प्रतिनिधी-आज अवयवदान करणे काळजी गरज आहे. ग्रामीण भागातील लोकामध्ये याची जाणीव जागृत करणे गरजेचे आहे.आपल्या देशात अवयवदानात मागे आहोत. इतर देशात यांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर असल्याने अवयवदानात नागरिक अव्वल आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे.पाच लाख लोकांना अवयवदानाची गरज आहे.
आज दोन लाख लोकांना लिव्हरची गरज आहे, दोन लाखो लोकांना मुत्रपिंडाची गरज आहे. व इतर एक लाख लोकांना इतर अवयवदानाची गरज आहे. असे अमळनेर येथे पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथील जुना टाऊन हाँलमध्ये देहदान व अवयवदान या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ नरेंद्र ठाकुर जळगांव बोलत होते.
ते पुढे म्हणाले की पैशाच्या जोरावर अवयवदान होत नाही. कायदेशीर बाबी पुर्ण झाल्याशिवाय होत नाही. अवयवदान कोण करू शकतो,या संदर्भात त्यांनी सविस्तर व्याख्यानमालेतून माहिती सांगितले.
व्यासपीठावर व्याख्याते डॉ नरेंद्र ठाकूर जळगाव व प्रमुख पाहुणे उपक्रमशील शिक्षिका मनीषा चौधरी (प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा शिरसाळे), वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे
चिटणीस प्रकाश वाघ होते.व्याख्यान कर्ते यांचा परीचय वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी केला.तर अतिथीचा परीचय विजयसिंग पवार यांनी केला. कार्यक्रमाची सुरवातीला पुज्य सानेगुरुजी यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात आले.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कै.प्रा.श्रीमती पद्माबाई तेजस्वी निजसुरे व प्रा.टी.एच.बारी यांनी आपल्या नातेवाईकांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून दरवर्षी स्मृती व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी हि पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे दिनांक १२/१०/२०१९ वार शनिवारी संध्याकाळी देहदान व अवयव दान याविषयावर डॉ नरेंद्र ठाकुर यांनी सविस्तर देहदान व अवयवदान या विषयावर सविस्तर प्रकाश टाकला.
अमळनेर येथील देशमुख वाडा परिसरातील सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर सुपडु भामरे व मीना सुधाकर भामरे या दाम्पत्याने देखील देहदानाचा निर्णय जाहीर केला आहे. देहदानाचा संकल्प करणाऱ्या सहपत्निक सत्कार करण्यात आला.
व्याख्यान मालेला प्रा.डॉ रमेश माने,सानेगुरुजी शाळेचे मुख्याध्यापक सतीश देशमुख, सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील, शिक्षक अशोक पाटील, चंद्रकांत पाटील,होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा. डाँ माधुरी भांडारकर, व कार्यकारणी सदस्य
पी एन भादलीकर, भीमराव जाधव, ईश्वर महाजन ,, प्रसाद जोशी व वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाचनालयाचे सदस्य अँड रामकृष्ण उपासनी यांनी केले तर आभार प्रदर्शन भिमराव जाधव यांनी केले.यावेळी श्रोते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button