माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची हंड्याकुंड्या सिंचन प्रकल्पास भेट
लतीश जैन
सन १९९८ पासुन प्रशासकीय मान्यता मिळालेल्या हंड्याकुंड्या हा सिंचन प्रकल्प गेल्या २२ वर्षा पासुन वनी करणासाठी पर्यायी जमीन न मिळाल्याने प्रलंबित होता पर्यायी वन जमिन मिळण्यासाठी आमदार सौ. लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सतत पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी अवश्यक असणारी पर्यायी वन जमीन मिळवुन दिली या प्रकल्पालाचा कामाला तात्काळ चालना मिळावि म्हणुन आज वन विभाचे साहय्यक वन संरक्षक व्ही.ए.पवार वनक्षेत्रपाल समाधान सोनवणे तसेच वन्यजीवचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार व लघु पाटबंधारे उप अभियंता एन.टी.आढे व प्रकल्प सल्लागार उज्वल पाटील यांच्या सह हंड्याकुंड्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून या कामाचे सुधारीत अंदाज पत्रक तयार करून शासनाकडे प्रथम सुप्रमा मिळण्यासाठी संबधित अधिकारी यांना सुचना केली.
या प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्यावर दोन दशलक्ष घनमिटर इतका पाणी साठा होणार असुन या मुळे २६० हेक्टर इतकी जमीन सिंचनाखाली येणार आहे त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवाना याच्या फायदा होणार असल्याने आदिवासी बांधवानी समाधान व्यक्त केले या प्रसंगी सुकलाल कोळी तालुका संघटक सुनिल पाटील प्रताप पावरा प्रल्हाद पाडवी आत्माराम पावरा विकास बारेला चिमा पावरा पंडीत कोळी गणेश न्हावी गिलदार बारेला हनुमान राठोड प्रविण पावरा यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थीत होते.






