Pandharpur

लोटस स्कुलमध्ये निबंध, चित्रकला, हस्तकला व पोस्टर मेकिंगच्या ऑनलाईन स्पर्धा संपन्न

लोटस स्कुलमध्ये निबंध, चित्रकला, हस्तकला व पोस्टर मेकिंगच्या ऑनलाईन स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर – कोरोना व्हायरसचा संभाव्य प्रादुर्भाव आपल्या सर्वांना आपापल्या घरात राहूनच रोखायचा आहे व या आजारातून आपला बचाव करायचा आहे पण विद्यार्थ्यांना बऱ्याचदा घरात बसून प्रश्न पडतो की आपल्याला उपलब्ध झालेला एवढा वेळ कसा घालवायचा? तेंव्हा विद्यार्थ्यांना या उपलब्ध वेळेचा सदुपयोग म्हणून आपला छंद जोपासता यावा, आपल्या कल्पनांना वाव देऊन आपल्याला नवनिर्मीतीचा आनंद मिळवता यावा व त्यातून बक्षीसेही मिळण्याची संधी मिळावी या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल कडून निबंध, चित्रकला, हस्तकला व पोस्टर मेकिंग या विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये तब्बल 350 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी लोटस इंग्लिश स्कूलमध्ये राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच.एम. बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button