? जळगाव Live..जळगावात बंदुकीचा धाक दाखवून दुचाकीवरून 15 लाखाची रोख रक्कम लंपास..!भर रस्त्यावर थरार..!आरोपी फरार..!जिल्ह्यात नाकाबंदी..!
जळगाव मधील पंचमुखी हनुमान मंदिराजवळची घटनाजळगाव येथे भरदिवसा दुचाकीवरून १५ लाख रूपयांची कॅश घेऊन दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रोकड घेऊन फरार झाल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना ही जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात सायंकाळी 5 ते 5.30मिनिटांनी घडली आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की महेश चंद्रमोहन भावसार (वय ५३, रा. दिक्षीतवाडी, जळगाव) आणि संजय सुधाकर विभांडीक (वय५१, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे आज सायं 5 वाजेच्या सुमारास १५ लाख रूपयांची रोकड घेऊन सिव्हील हॉस्पीटलच्या दिशेने जात होते. यातील महेश भावसार यांच्याकडे रोकड असून ते एका दुचाकीवर होते. तर विभांडीक हे त्यांच्या सोबत दुसर्या दुचाकीवरून जात होते. हे दोन्ही जण पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आले असतांना त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. यातील एकाने महेश भावसार यांच्याकडून रोकड असणारी बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला यश आले नाही. यामुळे चोरट्याने रिव्हॉल्व्हर काढून त्यांना धमकावले. याप्रसंगी झालेल्या झटापटीत रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. एक चोरटा दुचाकीवरून तर दुसरा पळत जाऊन घटनास्थळावरून फरार झाला. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा थरार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्ह्यात नाकबंदी वाढविण्यात आली आहे. सर्व तालुक्यात ठिकठिकाणी नाकबंदी सुरू असून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांना अडवून चेक केले जात आहे. पल्सर गाडी वर आरोपी फरार झाले असून आरोपी धुळे येथील असल्याचे सांगितले जात आहे. सर्व एक्सिट रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अमळनेर येथेही चोपडा नाका,हेडावे नाका, सुभाष चौक येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक दुचाकी वाहन धारकास थांबवून मास्क काढून चौकशी करण्यात येत आहे.






