वैरी आला घरा,त्याचा सन्मान करा.वाघोली येथिल अखंड हरिनाम सप्ताहात निव्रुत्ती महाराज मतकर बरसले
सुनील नजन
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील अखंड हरिनाम सप्ताहातील पहिले पुष्प ह.भ.प.निव्रुत्ती महाराज मतकर यांनी गुंफले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की वैरी जरी घरी आला तर त्याच्या सन्मान करा.दि.१२ते२०फेब्रुवारी २०२० या काळात वै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या पुंण्यतीथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.ह.भ.प.निव्रुत्ती मतकर, भालसिंग महाराज, तुकाराम शास्त्री,उद्धव कुकूरमुंढेकर, शिवाजी देशमुख,अशोक इलग,स्वामी अद्वैतानंद,पांडुरंग गीरी यांची किर्तने होणार आहे.
२०/२/२०२० रोजी ह.भ.प.राम महाराज झिंजूर्के यांचे काल्याचे किर्तन होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे. हा सप्ताह ह.भ.प. भालसिंग महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.पारायण व्यासपीठ बळिराम रणमले हे चालवणार आहेत. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.






