Pandharpur

ओबीसींचे राजकीय हक्क पूर्ववत् मिळण्यासाठी अधिवेशनात निर्णय घ्यावा पंढरीत ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

ओबीसींचे राजकीय हक्क पूर्ववत् मिळण्यासाठी अधिवेशनात निर्णय घ्यावा पंढरीत ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहर व तालुक्यातील ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आज पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की ओबीसीचे जे राजकीय आरक्षण संपुष्टात आले ते पुन्हा पूर्ववत व्हावे व यासाठी राज्याचे सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय घ्यावा असे नमूद करण्यात आले आहे या आंदोलना प्रसंगी अध्यक्ष उत्तम बाबा चव्हाण, महिला अध्यक्ष साधनाताई राऊत, छायाताई खंडागळे, पूजा लवंगकर, प्रीती थीटे, अश्विनी भानुसे, आदम बागवान ,अण्णा धोत्रे, सयाजी बनसोडे, तुकाराम चव्हाण, इम्रान मनेरी, अजय तांबोळी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button