कोरोना पार्श्वभूमीवर गुटख्यामुळे सर्वत्र ठिकाणी अस्वच्छता गुटखा थुंकी मुळे लोकांच्या आरोग्यास मोठा धोका…
सावदा प्रतिनिधी /युसूफ शाह
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये असलेल्या सावदा गावात गुटका खाऊन फेकलेल्या खाली पुडयांचा साम्राज्य पसरलेला असून ते गावातील प्रत्येक गल्ली-बोळात सार्वजनिक रस्त्यांवर गटारी सह वाटेल त्याठिकाणी आढळतात दिसतात आणि असे चित्र राज्यभरात प्रत्येक ठिकाणी दिसतात व यामुळे सरकार द्वारे देशभरात राबवली जाणारी स्वच्छता अभियान मोहिमेचा पूर्णपणे फज्जा उडताना दिसत आहे तसेच गुटखा खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना त्यांच्या थुंकी मुळे सर्वत्र ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यास कोरोना पार्श्वभूमीवर मोठा धोका निर्माण झालेला आहे
सावदा येथे सिटी हॉस्पिटल स्टेट बँक पंजाब नॅशनल बँक पांडुरंग मेडिकल असलेल्या परिसरात अवैद्य गुटखा विक्री करणाऱ्यांचा अड्डा असून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा त्यांच्या दुकानात व तळघरात ठेवला जातात कोरोना पार्श्वभूमीवर हे होलसेल विक्रेते मन भावी पुणे गुटख्याची विक्री करण्याचा गोरख धंदा चालवितात व त्यातून वारेमाप पैसा कमवतात त्यांना हा लागलेला छंद थांबवण्यासाठी संबंधित अन्न व औषध प्रशासन विभाग लक्ष घालून कारवाई कधी करणार हा प्रश्न सर्वांना उद्भवत आहे तसेच या अवैद्य गुटका माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई आज तागायत झालेली नसल्याचे ही लोकांकडून बोलले जात आहेया अवैध गुटख्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीव व आरोग्यास मोठा धोका असून गुटखा खाऊन वाटेल त्या ठिकाणी थुकणार यांचे प्रमाण अधिक आहे त्यांच्या थुंकी मुळे जीवघेण्या आजाराला थेट आमंत्रण मिळते गुटखा खाऊन फेकलेल्या खाली पुड्या गावात सर्वत्र ठिकाणी आढळतात व यामुळे अस्वच्छता मध्ये भर पडते अशी स्थिती प्रत्येक शहर गाव खेड्यांची झालेली आहेत
बंदी असताना इतक्या अधिक प्रमाणात गुटका येतो कुठून संबंधित यंत्रणेला याचा सुगावा का लागत नाही की यामागे मोठी आर्थिक देवाण-घेवाण कारणीभूत असते ही बाब समजण्या पलीकडची आहेत अनेक वेळा दबाव आल्यानंतर होलसेल विक्री तेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून थेट एखाद्या किरकोड गुटका विक्री तेवर कारवाई होण्याची अधून मधून समजते आणि थेट विषयास बाजूला ठेवला जाते व हा तमाशा मुख्य सूत्रधार बसून बघतात म्हणूनच की काय गुटखा व पान मसाला राजरोसपणे सहज सर्वत्र ठिकाणी उपलब्ध आहे
कोरोना पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात रोज शेकडो बाधित आढळत आहे अशावेळी गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या मुळे सर्वत्र ठिकाणी फेकलेल्या खाली पुढयामुळे अस्वच्छता पसरून गंभीर आजार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सध्या कोरोना महामारी पासुन लोकांचे जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणरी सरकार व यंत्रणा सहित लाखो कोरोना योद्ध्यांचा हा एक प्रकारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अपमानच या गुटखा विक्रेत्यांकडून केला जात आहे तसेच शहरात असवचछता पसरवण्यात हेच अवैध सुटका विक्रेतेच कारणीभूत आहेत आपली तरुण पिढी या गुटखायाच्या विळख्यातून सुटावी म्हणून झोपेचा सोंग घेणारी संबंधित अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच स्थानिक यंत्रणा कडून या अवैध गुटखा माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे






