“लातूर बंद ” मध्ये विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा
भिम आर्मीच्या सोबत विविध सामाजिक संघटनेच्या अध्यक्षना ही अटक व सुटका
लातूर :-प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात CCA व राष्ट्रीय नोंदणीकृत प्रमाणपत्र NCR NPR पदोन्नती आरक्षण कायद्याच्या विरोधात भिम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष ऍड भाई चंद्रशेखर आझाद (रावण) याच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या भारत बंदच्या बंद ला पाठिंबा म्हणून २३फेब्रुवारी रोजी लातूर बंद ची हक्क लातूरच्या भिम आर्मी दिली होती लातूर बंद पुकारलेल्या भिम आर्मीच्या कार्यकर्त्याना लातुरात गांधी चौक पोलिसांनी धर पकड करून अटक केली व नंतर सोडून देण्यात आले
लातूर शहरात लातूर बंद पुकारण्याच्या प्रयत्नात असलेल्या सकाळी १०ते ११:३० वाजता दरम्यान गांधी चौक पोलिसांनी भिम आर्मी चे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे बबलू शिंदे बबलू गवळे विकास माने पाटील शिवाजी लांडगे कार्तिक गायकवाड आनंद पडसाळे सचिन चिंचोलीकर विवेक आहिर रोहित आदमाणे रवी कांबळे अमीर शेख तसेच ब्ल्यु पँथर संघटनेचे अध्यक्ष साधुभाऊ गायकवाड लष्कर ए भिम संघटनेचे अध्यक्ष रणधीर सुरवसे मराठा लिब्रेशन टायगर संघटनेचे अध्यक्ष महेश गुंड युथ वारीयर्स चे अध्यक्ष कश्यप सुरवसे अनिकेत गंडले तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे सान्नि बनसोडे आदी कार्यकर्त्याना गांधी चौक पोलिसांनी ठाण्याने ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले गेले यांचे वर कसलाही गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले असे पोलीस सूत्र कडून माहिती मिळाली.






