फैजपूर

सोशल मीडिया वरील आक्षेपार्ह पोस्ट वर प्रतिक्रिया देऊ नका – सपोनि राहुल वाघ

सोशल मीडिया वरील आक्षेपार्ह पोस्ट वर प्रतिक्रिया देऊ नका – सपोनि राहुल वाघ

मुबारक तडवी

येत्या काही दिवसांत ईद उन मिलादून नबी , वाल्मिकी जयंती,या पवित्र सण, तसेच येत्या काही दिवसांत बाबरी मशिद व रामजन्म भूमि या अतिसंवेदनशील विषयावर मा. सर्वोच्च न्यायलय यांचे कडून निकाल अपेक्षित आहेत हा निकाल देणारी यंत्रणा ही भारत देशाची सर्वोच्च न्याय यंत्रणा आहे याचं न्याय यंत्रनेने दिलेला निकाल सर्व भारतीय नागरिकांना सर्वमान्य व बंधनकारक आहे सदर निकाला नंतर आपण आपल्या गावातील एकात्मता व जातीय सलोखा अबाधित रहावा याकरिता सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मजकूर फेसबुक व्हॉटसप वर प्रसारित करू नका व येणाऱ्या पोस्ट कडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन सावदा पो स्टे चे सपोनि राहुल वाघ यांनी मोठा वाघोदा येथील ग्रापंचायत कार्यालयात घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केले
यावेळी प्रतिष्ठीत शेतकरी दादासो डी. के महाजन, पी टी महाजन सर मलिक हाजी अजीज म.रसूल. हाजी अताऊ ल्ला खान विजयकुमार पाटील माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी सरपंच मुकेश तावडे उप सरपंच लक्ष्मीकांत चौधरी ग्रा प सदस्य मुबारक ( राजु )तडवी भूषण चौधरी, माजी सरपंच राजेंद्र सावळे उत्तम वाघ सुनील चौधरी, हर्षल पाटील विशाल पाटील, हिदायत खान नजरुसेठ प्रकाश वायके पंकज मालखेडे राहुल महाजन सावदा पो स्टे चे गोपीनीय शाखेचे जगदीश पाटील शेख रिजवान आदीसह नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button