सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील “डॉक्टर “कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक काळाच्या पडद्याआड विजयसिंह माने सर
उपसरपंच ईश्वर वठार
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर तालुक्यातील सहकारी व शैक्षणिक क्षेत्रात 30 ते 40 वर्षे अखंड सेवा करणारे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक साहेब यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सहकार व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मोठी हानी झाले आहे. सहकार व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये त्यांचा डॉक्टर म्हणून उल्लेख केला जात होता. जनतेचा हक्काचा व अडचणीच्या काळात पाठीशी उभा राहणारा जनसेवक म्हणून जनतेने त्यांना मालक ही पदवी दिली होती. अनेक सहकारी संस्था उदा. अर्बन बँक, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, युटोफिन कारखाना या सहकारी संस्था उर्जित अवस्थेमध्ये चालवून गोरगरीब व शेतकऱ्यांना न्याय व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची किमया परिचारक साहेबांनी केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा सहकारी साखर कारखाना अव्वल स्थान निर्माण केले .निधनापूर्वी पोळ्याचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला निस्वार्थी व कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता अखंड समाजसेवा करत राहिले शैक्षणिक क्षेत्रांमध्येही कर्मयोगी कॉलेज शेळवे, कर्मयोगी हायस्कूल पंढरपूर व अनेक शिक्षण संस्था उभा करून युवकांना शिक्षणाची संधी दिली. आज त्यांच्या जाण्याने शिक्षक परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिक्षक हा समाजाचा पाया आहे आणि त्यांनी समाज घडवला पाहिजे व त्यासाठी कोणती लागेल ती गरज माझ्याकडून घ्या मी तुमच्या पाठीमागे ठाम पणे उभा आहे असे अभिवचन शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शकांना देऊन शैक्षणिक क्षेत्रातील पितामाहा बनण्याचे काम परिचारक मालकांनी केले . स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही सर्वसामान्य गोरगरिबांची कामे होण्यासाठी नगरपालिका; पंचायत समिती ;पंढरपूर जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचे महान कार्य केले. त्यांच्या जाण्याने नक्कीच ही पोकळी भरून निघणार नाही परंतु सहकार , शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची आठवण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे समाजसेवेचे व्रत अखंडपणे चालू ठेवण्यासाठी ईश्वराने आमदार प्रशांत परिचारक व उमेश मालक परिचारक यांचे हात बळकट करावेत . पुन्हा एकदा या शेतकऱ्याच्या पांडुरंगाला भावपूर्ण श्रद्धांजली..






