Pune

भवानीनगर मध्ये शिवशाही बसची उसाच्या बैलगाडीला जोरदार धडक, दोन बैलांचा जागीच मृत्यू

भवानीनगर मध्ये शिवशाही बसची उसाच्या बैलगाडीला जोरदार धडक, दोन बैलांचा जागीच मृत्यू

दत्ता पारेकर पुणे

पुणे : इंदापूर – बारामती रोड वरती मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसून येत आहेत. आताच काल परवा दोन-तीन अपघाताच्या गंभीर अशा घटना घडल्या असतानाच…. आज दिनांक १८ मार्च रोजी पहाटे ५विजता अकलूजकडे निघालेल्या शिवशाही बसने भवानीनगर येथे ऊसतोडणीसाठी निघालेल्या मजुरांच्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ऊसतोड मजुरांचे दोन बैल जागीच ठार झाले तर, दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

आज पहाटेच्या वेळी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याच्या उसाच्या बैलगाड्या बोरी गावाकडे ऊस तोडणीसाठी निघालेल्या होत्या. या बैलगाड्या इंदापूर बारामती रोडवर आल्या असता तोच पाठीमागून परेलहून अकलूजकडे निघालेली शिवशाही बसने अत्यंत वेगाने येऊन ऊसतोड बैलगाडीला जोरदार धडकली. त्यावेळेस ही बैलगाडी जागेवर फिरली असता पुन्हा शिवशाही गाडी ने समोरून या बैलगाडीला ठोकले.त्यामुळे बैल उडून रस्त्यावरून पडले. व त्यातील ऊसतोड मजूर ही बाजूला पडले. बैलांच्या पोटाला गंभीर धक्का बसल्याने एक बैल जागीच मृत्यू झाला . या गाडीमध्ये बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील रामराव सोनतळे व त्यांची पत्नी होते. हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुण्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
कारखाना प्रशासनाच्या वतीने कारखान्याचे व्हाईसचेरमन अमोल पाटिल तात्काळ या ठिकाणी उपस्थित होते व पोलिस प्रशासनाने ही तात्काळ या मजुरांना मदत केली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button