कोरोना बाबत माहिती पुस्तिकेद्वारे शिवसेनेकडून जनजागृती, किल्लारी येथे माहिती पुस्तिकेचे वाटप
किल्लारी | औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-
औसा तालुक्यातील किल्लारी येथे कोरोना बद्दल जनजागृती करण्यात आली.लातुर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती व्हावी या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू आजाराची महत्वाची माहिती पुस्तिका किल्लारी येथे काढली असून याचे वाटप दिनांक ६ मे रोजी किल्लारीचे माजी सरपंच युवराज गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप लोहार, शिवसेना तालुका समन्वयक किशोर जाधव,ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले,पप्पू बालकुंदे किशोर भोसले, रवी जाधव, संजय कोराळे आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना व्हायरस पासून स्वतःला वाचवणे व कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून या साठी काय काळजी घ्यावी .कोरोना विषाणू आजाराची लक्षणे ,हा आजार कसा पसरतो ? यासाठी काय काळणी घ्यायला हवी व कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर माहिती *’कोव्हिड- १९’* या पुस्तिकेत देण्यात आली आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने हाताळता येईल अशी ही पुस्तिका आहे.






