Pandharpur

मराठा महासंघ पंढरपूर यांच्या वतीने गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप

मराठा महासंघ पंढरपूर यांच्या वतीने गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर शहरतील अखिल भारतीय मराठा महासंघ व अर्जुनराव चव्हाण मित्र मंडळ पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने कोरोना महामारीच्या संकट काळात गोरगरीब व गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले.जवळ-जवळ१५०
कुटुंबांना किटचे वाटप करण्यात आले.आपणही समाजाचे देणे लागतो हे भान ठेऊन,सामाजिक बांधिलकी जपत,फुल नाही एक फुलाचीपाकळी या उद्देशाने एक मदतीचा हात,सहकार्य म्हणून हे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार समाधान दादा आवताडे म्हणाले की मराठा महासंघाच्या वतीने जो हा उपक्रम राबविला आहे तो अतिशय स्तुत्य आहे,या संकट काळात गोरगरीब व गरजूंना तुम्ही मदतीचा हात दिला आहे,या उपक्रमाचा इतरही आदर्श घेतील,पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून असेच समाज उपयोगी उपक्रम होओ असे मनोगत व्यक्त केले.तसेच जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषनात बोलताना म्हणाले की आम्ही मराठा महासंघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहे.कोरोनाच्या काळातही गेले वर्ष झाले आम्ही जेवण असो,फळे,भाजीपाला,
आयुष्य वर्धक काढा,धान्य वाटप करत आलो आहोत आणी यापुढेही आम्ही शक्य होईल तेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न करनार.याप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार मा समाधान दादा आवताडे,युवा नेते मा प्रणव दादा परिचारक,प्रांतसाहेब मा सचिनजी ढोले साहेब,जिल्हा परिषद सदस्य मा वसंत नाना देशमुख,मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा अर्जुनराव चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष मा सचिन गंगथडे,तालुका कार्याध्यक्ष मा शिवाजी मोरे,पंढरपूर शहराध्यक्ष श्री अमोल पवार,शहर उपाध्यक्ष श्री शामराव साळुंखे,शहर संघटक श्री काका यादव,श्री विक्रम बिस्किटे सर,संत पेठ विभाग प्रमुख श्री पांडुरंग शिंदे,रिक्षा संघटना अध्यक्ष श्री नागेश गायकवाड,शहर उपाध्यक्ष श्री यशवंत बागल,शहर सचिव श्री प्रमोद कोडग,मालवाहतूक संघटना अध्यक्ष श्री राहुल यादव,उपाध्यक्ष श्री सोमनाथ झेंड,श्री समाधान घायाळ, श्री भास्कर घायाळ,श्री सोपानकाका देशमुख,महेश माने,लक्ष्मण जाधव,सचिन थिटे,सचिन नडे,मनिष कुलकर्णी,मोहित साळुंखे,प्रमोद परदेशी,रोहित चव्हाण,वैभव चव्हाण यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button