Faijpur

फैजपूरात शिवभोजन थाळी केंद्र

फैजपूरात शिवभोजन थाळी केंद्र

फैजपूर । प्रतिनिधीसलीम पिंजारी

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जेवणावळीचीही हॉटेले
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जेवणावळीचीही हॉटेले बंद आहेत. त्यामुळे हास्पिटल, मोलमजुरी करीता शहर परिसरात झोपडीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना एकवेळचे अन्न मिळणेही कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बस स्थानक जवळील गुरुदेव प्लाझा व्यापारी संकुल येथे केंद्र संचालक चंद्रकांत जाधव (पप्पू मेस) यांना शासनाने मंजूर केलेल्या शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात करण्यात आले.

या शिवभोजन १०० थाळी मंजूर असल्याने गरजू नागरिक यांनी सोशल डिस्टन्स साधून पार्सल स्वरूपात ५ रुपयांत भोजन देण्यात आले.
या केंद्राचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा महानंदा होले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण,स.पो.नि प्रकाश वानखेडे,उपनगराध्यक्ष रशीद तडवी,नगरसेवक हेमराज चौधरी, शेख कुर्बान अमोल निंबाळे,मंडळधिकारी जे.डी बंगाळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button