Maharashtra

अचानक तब्बेत बिगडल्याने अहो रात्री धावून आले डॉ किरण बडगुजर व केला उपचार मानले आभार

अचानक तब्बेत बिगडल्याने अहो रात्री धावून आले डॉ किरण बडगुजर व केला उपचार मानले आभार

रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील श्री गुलाबराव पाटील हे सलग 2 वर्षा पासून आजरी असल्याने ते घरात असत अचानक रात्री 10 वा तब्बेत जास्त बिघडल्याने त्याना झटका आल्यासारखे झाले त्यांना होणारा जबर त्रासामुळे त्यांचे बोलणे देखील बंद झाले या बाबत घरात भीती चे वातावरण निर्माण झाले असता आता काय करायचे संपूर्ण शहर लॉक डाउन सध्याची परिस्थिती पाहता आता कोणत्या डॉक्टरांकडे घेऊन जावे काही सुचत नसल्याने आता काय करावे असा प्रश उपस्थित झाला त्याच वेळी गुलाबराव पाटील यांच्या मुलाने डॉ किरण बडगुजर यांच्या शी संपर्क साधला असता डॉक्टर यांनी शब्दाला तात्काळ होकार दिला त्याच वेळी रुग्णास यांच्या श्री दत्त हॉस्पिटलमध्ये तात्काळ आणले त्याच क्षणी डॉ किरण बडगुजर काही मिनिटांत पोहचले व तपासणी करत पुढील उपचार सुरू केला व सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी मोकळा स्वास घेतला आजची परिस्थिती पाहता आहोरात्री धाव घेत येणार व अशा कोरोना महामारी संकटात धाव घेणारे एक कोरोना योद्धा व देवमाणूसच या बाबत गुलाबराव पाटील यांच्या नातेवाईकांनी डॉ किरण बडगुजर यांचे आभार मानत दिलगिरी व्यक्त केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button