अवैध बिल्डींग मटेरील सपलायर्स चे दुकानातून माल विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करा….
देशभरात कोरोना महामारीच्या आजाराचे संक्रमण असताना सुद्धा लॉक डाउन मध्ये अवैधरित्या बिल्डींग मटेरील सपलायर्स चे दुकानातून माल विक्री करणे चालू असून अशा विक्रेत्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी तहसीलदार पातूर ह्यांना करण्यात आली
विलास धोंगडे
कोरोना महामारीच्या आजारामुळे सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन असून अश्या संकटमय परिस्थितीत पातूर शहरातील बिल्डिंग मटेरियल विक्रेते सुनील म्हैसने अवैधरित्या आपल्या लोहा, सिमेंट, व घर बांधकामासाठी लागणारे साहित्य अवैधरित्या विक्री करत आहेत.व त्यामध्ये सुध्दा अश्या संकटमय परिस्थिती मध्ये सुद्धा ग्राहकाकडून मूळ किमतीच्या ऐवजी जास्त दराने पैसे वसूल करून स्वतःचा स्वार्थ जपत आहेत. तरी ह्या सर्व बाबीची प्रत्यक्ष दर्शी अनुभव मी स्वतः सागर संजय इंगळे (सामाजिक कार्यकर्ता) असून माझे मित्र अमोल करवते मु.आस्टूल ता.पातूर येथील रहिवाशी असून आपल्याला भेटलेल्या घरकुलाचे काम रखडलेले असून अश्या परिस्थितीत आपण थोडं फार घरी न बसता स्वतः काम करून आपली मजुरी वाचवू ह्या दृष्टिकोनातून सुनील म्हैसने ह्यांच्या दुकानात सिमेंट खरेदी करीत आले असता त्यांनी अनाधिकृत पैसे मागितले व कच्ची पावती दिली आहे.तरी हा वेळेचा व परिस्थिचा सदुपयोग घेऊन विक्रेते सुनील म्हैसने आमच्यावर अन्याय करत असून ह्यांच्यावर योग्य ती कारवाही व्हावी ह्या मागणीची तक्रार सागर इंगळे सामाजिक कार्यकर्ते व अमोल करवते ह्यांनी लेखी तक्रार तहसीलदार ह्यांना केली आहे.






