Rawer

शेख-मलिक परिवाराने साखरपुड्यात बांधली लग्नाची रेशीमगाठ

शेख-मलिक परिवाराने साखरपुड्यात बांधली लग्नाची रेशीमगाठ

मोठा वाघोदा, सावदा येथील मुस्लिम समाजातील मलिक शेख परिवारातील आदर्श विवाह

रावेर/मुबारक तडवी

सावदा तालुका रावेर येथील शेख रशिद शेख हुसैन यांचा ( वर) मुलगा शेख आबिद शेख रशिद यांचा मोठा वाघोदा येथील रहिवासी मलिक शकील मलिक रफीक यांची मुलगी (वधू)शबीना बी हिचेस साखरपुड्याचे नियोजित कार्यक्रमानुसार मुस्लिम समाज शुभ मंगल तिथी रितीरिवाजानुसार आज पार पडत असतानाच नववरवधू पक्षांकडील मंडळी व मुस्लिम समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सावदा येथील रहिवासी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सैय्यद असगर भाई व मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कालू मिस्तरी उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मलिक शाकिर आदिंसह समाज बांधव यांनी लग्नाचा वायफळ खर्च ,दान दहेज हुंडा यांना थारा न देता साखरपुड्याचे औचित्य साधून सावदा व मोठा वाघोदा शेख आणि मलिक कुटुंब यांनी लग्न लावत मुस्लिम समाजात नविन आदर्श घडवला या आदर्श विवाह सोहळा बद्दल मोठा वाघोदा सह परिसरात या कुटुंबांचे कौतुक केले जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button