Amalner

मारवड पोलीस स्टेशनची बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून निवड झाल्याने मान्यवरांनी केला एपीआय राहुल फुला यांचा सत्कार…

मारवड पोलीस स्टेशनची बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून निवड झाल्याने मान्यवरांनी केला एपीआय राहुल फुला यांचा सत्कार…

नूरखान

अमळनेर :- तालुक्यातील मारवड पोलीस ठाणे हे महाराष्ट्रातून बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले आहे. त्यामुळे परिसरातील विविध मान्यवरांनी पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी राहुल फुला यांचा सत्कार केला.

सन २०१९ करीता महाराष्ट्रातुन टाॅपर होत मारवड पोलीस स्टेशनला बेस्ट पोलीस स्टेशनचा बहुमान मिळाला आहे. सन २०१९ मध्ये स.पो. नि. समाधान पाटील व १ जुलै २०१९ पासून आतापर्यंत स.पो.नि. राहुल फुला हे या पोलिस ठाण्याची धुरा सांभाळत आहेत. सदर बहुमान मिळाल्याबद्दल विविध स्तरातील मान्यवरांकडून पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काल दि. २९ रोजी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांचा पुषपगुच्छ देऊन मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी मारवड ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष एल एफ पाटील, पत्रकार डॉ. विलास पाटील, चव्हाण रावसाहेब, एम के पाटील, के व्ही पाटील, प्रशांत साळुंखे तसेच सामाजिक कार्यकर्ते उमाकांत भाऊसाहेब, व धार येथील माजी उपसरपंच अलीम मुजावर यांनी सत्कार केला. यावेळी मारवड पोलिस ठाण्याचे कर्मचारी रोहिदास जाधव, फिरोज बागवान, सुनील तेली, सुनील अगोने यासह होमगार्ड बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button