Kalwan

अन् आमदारात “कार्यकर्ता” दिसला

अन् आमदारात “कार्यकर्ता” दिसला….

विजय कानडे

काल वळवण डेपोच्या धुळे- कळवण या बस व रिक्षाचा मोठा अपघात मेशी फाट्या जवळ झाला . या अपघातात निष्पाप जवळपास ३० प्रवासी मृत्युमुखी पडले .अनेक प्रवाशांचे गंभीर दुखापतीवर निभावले . अपघात झाल्यानंतर तात्काळ मदतीसाठी आजूबाजूच्या परिसरातील तरुण धावून आले . या मदत करणाऱ्या तरुणांमध्ये एक चेहरा होता देवळा चांदवड तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांचा~~~ ! अपघात झाल्याक्षणी त्या ठिकाणी पोहोचून कार्यकर्ते व अधिकाऱ्यांना सूचना देऊन स्वतः मदत कार्यात सक्रीय होणारा आमचा आमदार~~! अपघातग्रस्त विहिरीत स्वतः कार्यकर्त्यांसमवेत उतरून जखमींना बाहेर काढून त्यांच्या उपचारांचीही सोय तात्काळ उपलब्ध करून देणारा आमचा आमदार~~! गेल्या अनेक वर्षांत कार्यकर्ते “आमदार” झाल्याचे बघितले पण अशा वेळेस आमदार “कार्यकर्ता” झाल्याचे प्रथमच बघितले~~!! कालच्या अपघातसमयी मदत करणारे परिसरातील सर्व तरुण मंडळी , देवळ्यातील डॉक्टर्स ,सिव्हिल हॉस्पिटल देवळ्याचा सर्व स्टाफ , यांची ही अभिमानास्पद कामगिरी ~~ आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्यासाठी सतत २ वेळा आपले बोट काळे केल्याचा सार्थ अभिमान~~

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button