Pandharpur

आ.प्रशांत परिचारक आणि आ.समाधान आवताडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! भावी नगरसेवक उमेश सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक ,कला,व क्रीडा मंडळ यांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांना निवेदन सादर

आ.प्रशांत परिचारक आणि आ.समाधान आवताडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! भावी नगरसेवक उमेश सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक ,कला,व क्रीडा मंडळ यांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांना निवेदन सादर

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : सोलापूर मध्ये नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाहोता. या मोर्चाला जात असताना पंढरपूर मंगळवेढ्याचे आ.समाधान आवताडे यांचा गाडीचा ताफा पोलिसांनकडून आडवण्यात आला ,संतप्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढ्याचे आ. समाधान दादा आवताडेंनी रस्त्यावरच आपल्या ठिय्या मांडला, त्यामुळे आ. समाधान आवताडे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर महामार्गावर ठिय्या आंदोलन केले, तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नांसाठी आ.प्रशांत परिचारक आणि आ. समाधान आवताडेंनी उपस्थिती लावली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत मराठा समाजाचा प्रश्न हळवा असल्याने नेतृत्व करणाऱ्यावर असे गुन्हे योग्य नाही म्हणून आ. प्रशांत परिचारक आणि आ.समाधान आवताडे यांच्या वरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत यासाठी भावी नगरसेवक उमेश सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी युवक नेते उमेश सर्वगोड,समाजसेवक निलेश जाधव, ऍड प्रशांत सर्वगोड आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button