बार्शी रोडवरील मांजरेश्वर हनुमान मंदिरांचे समोर भाजपाने आंदोलन केले
कुलूप काढून भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे द्वार झाले खुले
लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने व्यंकटराव पनाळे यांच्या नेतृत्वात मंदिर उघडण्यासाठी घंटानाद व भजन करून आंदोलन
लक्ष्मण कांबळे
लातुर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. आ. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस मा. श्री. विजयराव पुरानिक साहेब, भाजपा नेते मा. आ. श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा. श्री गुरुनाथ मगे यांच्या मार्गदर्शनानुसार आज लातूर शहर जिल्ह्यात सर्वच धर्मीयांचे मंदिरे, मस्जिदी, चर्च, गुरुद्वारे, हि धार्मिक स्थळे खुले करण्यात यावेत या मागणीसाठी वेगवेगळ्या धार्मिक संस्थानी आणि त्यात प्रामुख्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले.
त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून लातूर पासून १२ किलोमीटर अंतरावर बार्शी रोडवरील मांजरेश्वर हनुमान मंदिराच्या समोर ” दार उघडा उद्धवा मंदिराचे दार उघडा अशा घोषणा देत व मंदिराच्या प्रवेशद्वारावर भजन करत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले या वेळी भाजपचे लातुर जिल्हयातील व शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात हजेरी लावली होती.






