Maharashtra

अमळनेर नगरपरिषदेची करारनामा मोडून फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसला मुख्याधिकारींकडून सिल..…..

अमळनेर नगरपरिषदेची करारनामा मोडून फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसला सिल..…..

अमळनेर नगरपरिषदेची करारनामा मोडून फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसला मुख्याधिकारींकडून सिल..…..

शहरात गेल्या ६ महिन्यापासून पालीका प्रशासन व प्रथमेश एन्टरप्राईझेस यांचेशी करारनामा करून जिवनधारा योजने अंतर्गत शहरात ५ ठिकाणी मशिनी लावून १ रू लिटर प्रमाणे पाणीपुरवठा केला जात होता.या कंपनीला मिळणाऱ्या ऊत्पन्नातून पालीकेला नफा मिळत होता.

अमळनेर नगरपरिषदेची करारनामा मोडून फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसला मुख्याधिकारींकडून सिल..…..

नगरपालिका तर्फे शुद्धपेय जल पुरवठा करण्याचे  ( r. o) प्लांट चे काम देण्यात आले होते. तरी संबंधित नाशिकच्या ठेकेदाराने पाण्याची उपलब्धता स्वतः करायची असताना कराराचे उल्लंघन करून प्रमुख जलवाहिनीतून पाण्याची जोडणी करून अवैधरित्या कनेक्शन घेतल्याचे पहाणीत नगरसेवकांनी लक्षात आणून दिल्याने मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी या प्लॉंटला सिल लावले आहे . या संस्थेशी राजकीय पदाधिकारीशी लागेबंधे असल्याचा विरोधी नगरसेवकांनी आज आरोप करित सिंधी कॉलनीतील या प्लँटवर धावा केला .

अमळनेर नगरपरिषदेची करारनामा मोडून फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसला मुख्याधिकारींकडून सिल..…..

 शहराला पाणीपूरवठा करणाऱ्या मूख्य जलवाहीनीला जोडणी करून या ठिकाणी पाणी घेतले जात होते तेच पाणी थंड करून जनतेला विकले जात होते हि बाब आज पाणी पूरवठा अभियंता यांनी प्रत्येक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता अवैध कनेकशन आढळले. यावेळी आरोग्य सभापती संजय भिल यांनी स्वतः खोदून केलेले अवैध कनेक्शन दाखवल्याने कर्मचारी अवाक झाले.

 सदर प्लँट धारकाला पालीकेने जागा ऊपलब्ध करून द्यावी व पाण्याची व्यवस्था त्यांनी स्वतः करावी असा करारनामा झाला असतांना पालीकेची फसवणूक करून जनतेला विकत पाणी पाजले व आर्थीक हित जोपासले असा आरोप गटनेते बबली पाठक यांनी केला. यावेळी हि बाब मूख्याधिकारींना लक्षात आल्याने त्यात तथ्य आढळून आल्या त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जीवनधारा चा प्लांट ला नगरपरिषदेने ने सील केलं.सिंधी कॉलनी ला १५ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त  झालेले होते.सिंधी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

अमळनेर नगरपरिषदेची करारनामा मोडून फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसला मुख्याधिकारींकडून सिल..…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button