Nashik

नाशिक जिल्ह्यातील सफाई कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही समस्या सोडवा अन्यथा तिव्र आंदोलन करणार महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे.

नाशिक जिल्ह्यातील सफाई कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही समस्या सोडवा अन्यथा तिव्र आंदोलन करणार महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : आज दिनांक रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. भालचंद्र गोसावी यांची भेट घेऊन वरील विषयांतर्गत निवेदन दिले.

जिल्ह्यातील तमाम नगरपालिका नगरपरिषदा मधील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अहोरात्र कार्य करून जनतेची सेवा केली परंतु काही नगरपालिकांमध्ये अनुकंपात्वावरील नागरिकांचे कामे झालेली नाहीत त्याचप्रमाणे येवला नगरपालीकेत काही मागास वर्गीय कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले त्यांना त्वरित नोकरीत सामावून घ्या तसेच कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी सोडवा.

याप्रसंगी रिपाई येवला तालुका अध्यक्ष गुड्डभाई जावळे, युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे, मुकेशभाऊ जावळे, बाळाभाऊ पगारे,कांचन केदारे, सुयश पगारे, अनिकेत जावळे, सागर साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील सफाई कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही समस्या सोडवा अन्यथा तिव्र आंदोलन करणार महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button