Solapur

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या पदांवर पीएच.डी. धारक शिक्षकांची नियुक्ती करावी.डॉ अनिल सर्जे

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या पदांवर पीएच.डी. धारक शिक्षकांची नियुक्ती करावी.डॉ अनिल सर्जे

महाराष्ट्र विद्यावाचस्पती (पीएच.डी.) शिक्षक संघटना राज्याध्यक्ष डॉ. अनिल सर्जे यांची शासनाकडे मागणी.

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागात वर्ग-१, वर्ग- २,
शिक्षण विस्तारअधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध प्रशासनातील यंत्रणेवर अतिरिक्त पदभार येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या सर्व रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या वर्ग-१, वर्ग- २, शिक्षण विस्तारअधिकारी व केंद्रप्रमुख या पदावर सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनातील कार्यरत असणाऱ्या विद्यावाचस्पती (पीएच.डी.)धारक शिक्षकांची नियुक्ती करणेबाबत चे निवेदन महाराष्ट्र विद्यावाचस्पती (पीएच.डी.) शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अनिल सर्जे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सेवाशर्ती बनवताना विविध व्यवस्थापनातील कार्यरत असणाऱ्या शाळांमध्ये पीएच.डी. पदवी धारक शिक्षक उपलब्ध नव्हते. त्यामुळे सेवाशर्ती मध्ये या उच्चविद्याविभूषित शिक्षकांचा कोठे ही विचार केला गेला नाही. आज महाराष्ट्रात सुमारे शंभरच्या पुढे शिक्षक पीएच.डी. धारक आहेत. ते विविध व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागासाठी ही बाब भूषणावह आहे. आजपर्यंत शालेय शिक्षण विभागातील विविध पदावर पदोन्नती व भरती करताना या शिक्षकांचा कधीही विचार केला नाही. ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आपली नोकरी सांभाळून शैक्षणिक गुणवत्ता वाढवली आहे, संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. अशा शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करून विविध पदावर बढती दिल्यास शालेय शिक्षण विभागाची निश्चितच प्रगती होणार आहे. ही बाब भारतातील सर्व राज्यासाठी आदर्श ठेवणार आहे. महाराष्ट्र विद्यावाचस्पती (पीएच.डी.) शिक्षक संघटनेतर्फे अशी विनंती करण्यात आलेली आहे की महाराष्ट्रातील पीएच.डी. धारक शिक्षकांना योग्य पदावर बढती देऊन त्यांचा सन्मान करावा, शालेय शिक्षण विभागाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी या सर्व संशोधक शिक्षकांचा योग्य उपयोग करावा. भारतामध्ये महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभाग सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी हे शिक्षक निश्चितच आपले योगदान देतील याची खात्री आहे. अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र विद्यावाचस्पती (पीएच.डी.) शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. अनिल सर्जे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button