sawada

सावद्यात शरीआ मुस्लिम ग.स.को.क्रे.सोसायटीची वार्षिक सभा झाली संपन्न.

सावद्यात शरीआ मुस्लिम ग.स.को.क्रे.सोसायटीची वार्षिक सभा झाली संपन्न.

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील जागृत शिक्षकांनी जिल्ह्यातील उर्दू शाळांचे शिक्षकांना सोबत घेऊन प्रथमच शरीआ मुस्लिम गव्हर्नमेंट सर्व्हंट को क्रेडिट सोसा लि सावदा ही सोसायटीची स्थापना करून कौतुकस्पद व उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

तसेच या सोसायटीची सर्व साधारण सभा दि.२६ सप्टेंबर २०२१ रविवार रोजी सावदा येथे मुस्लिम तडवी हाॅल जमादार मोहल्ला येथे सोसायटीचे अध्यक्ष गौस खान हबीबुल्ला खान सावदा यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. सभेत सोसायटीचे उपाध्यक्ष सै. नफीस अहमद, जळगांव, सचिव असलम जनाब सावदा,संचालक मुजीबुर्रहेमान, महेरबान खाॅ तडवी,शेख इलियास कुरैशी सर,जावेद अख्तर शेख हबीब,शेख रईस न्याजमोहम्मद,आसिफ खान सर, शेख कमालुददीन जनाब,महिला संचालक गजाला तबस्सुम,रईस खान सुब्हान खान,अफशा तरननुम खान व अफजाल अहमद इकबाल अली उपस्तीथ होते.

यावेळी सभेची सुरुवात शाकिर सर रावेर यांनी पवित्र कुराण शरीफ की आयत पठण करून केली. त्या नंतर प्रख्यात कवी बासित उमर आझमी चिनावल यांनी नात शरीफ पठाण केले.देशा साठी आपल्या प्राणा ची आहुती देणारे शूर सैनिक, सोसायटीचे दिवंगत संचालक शेख अलीम शेख भीकन , सभासद शेख नदीम शेख रऊफ, इकबाल मुज्तेबा नासिर,शेख सलाहुद्दीन शेख जैनुद्दीन , शेख शकील शेख उस्मान, शेख अझहर गौस, यां यांच्यासाठी दुवाये मकफेरत श्रृद्धांजलि वाहण्यात आली.शेख जावेद सर यावल,आसिफ खान जामनेर, व विविध क्षेत्रात पारितोषक मिळविलेल्या सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सभे समोर वार्षिक अहवाल वाचन श्री.सुनिल वाणी यांनी केले सभेत घेण्यात आलेले सर्व विषयांना त्यावेळी सर्व अनुमतीने मंजुरी देणयात आली. सभेचे आदर्श सुत्र संचालन शेख इलियास शेख अहमद कुरैशी सर यांनी केले.सोसायटीचे जिल्हातील सदस्य संख्याने उपस्थित होते.
शेवटी संस्थेचे अध्यक्ष गौस खान हबीबुल्ला खान यांनी मनोगत व्यक्त केले की, सदरील सोसायटी द्वारे सभासदांना कायदयाच्या चौखटीत राहुन न्यूनतम सर्व्हीस चार्जेसवर कर्ज उपलब्ध करून देत आहे. कोरोना महामारीत सरकारी कर्मचा-यांना भेट घेता आली नसल्याने भविष्यात अधिक सभासद वाढीवर आम्ही लक्ष देणार आहोत. यासोबत सर्व संचालक देखील सोसायटीचे सभासद बनविण्यावर भर देणार
आहे. रईस खान सुभान खान यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले व सभा समाप्तीनंतर नंतर सर्व सभेत येणाऱ्या शिक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button