Maharashtra

चांपा येथे आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

चांपा येथे  आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

चांपा येथे आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

चांपा ता २१ (प्रतिनिधी) अनिल पवार

राज्यभरात ठिकठिकाणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. चांपा ग्रामपंचायत  परिसरात योगसाधकानी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन ला भरभरुन प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योगाला प्रारंभ करण्यात आला. चांपा  मध्ये जागतिक योगदिनाच औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय  मध्ये योगदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अतिश पवार होते .यावेळी अध्यक्षीय भाषणात योगा संबंधित माहिती देतांना ग्रामीण भागात योग दिवस साजरा करतांना योगदिनाचा प्रचार व प्रसार व्हावे करीता ग्रामपंचायत मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याची माहिती देत  चांपा ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदाच योग दिवस साजरा करण्यात आला.

देशभरात योगाभ्यासी मंडळाचे कार्यकर्ते योगाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. २१ जूनला सकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला सुरवात झाली असून  ग्रामपंचायत कार्यालय चांपा व योग साधक व विविघ संस्थाच्या सहकार्याने सामूहिक योगासन प्रात्याक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शरीर, संचालन, ताडासन, उत्काटसन, कटिचक्रासन, गोमुखासन, उष्ट्रासन, जानुशिरासन, कटिवक्रासन, योगनमनासन, सूर्यनमस्कार आणि नंतर प्राणायम होईल. अष्टांग योगाचे प्रात्याक्षिक यावेळी योग शिक्षक हेमंत तलवारे यांनी सादर केले  . या शिवाय चांपा गावात  योगाचे वर्ग चालवले जातील, असेही सरपंच अतिश पवार यांनी सांगितले. 

तसंच विजय विद्यालयचे मुख्यध्यापक  क्रीडा व व्यापारी संकुलात योगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सरपंच अतिश पवार,  उपसरपंच अर्चना सिरसाम ,ग्रामसेवक सुनील तायवाडे,   विजय विद्यालयचे मुख्याध्यापक व्ही .एन .नागदेवे सर  मा .जिल्हापरिषद शाळेचे  सहाय्यक शिक्षक  विजय शेटे, चंदा .एम .गायकवाड , सारिका .बि .वेलके जिल्हापरिषद शाळा व्यवस्थापन समितीचे मिताराम भोसले , अंगणवाडी सेविका शीलाबाई .न .अडकने  आदीवासी युवा सेनेचे अध्यक्ष शिवशंकर राजपूत कृष्णा इरपाते आशिष तोडासे , तनिष्का गट प्रमुख वैशाली वरठी, मिराबाई मसराम , विजय विद्यालयचे शिक्षक ए .व्ही .राठोड , मुक्ता कुळमेथे, योगा शिक्षक एच. आर.तलवारे व जिल्हापरिषदचे विद्यार्थी .विजय विद्यालयचे एन सी सी चे विद्यार्थी अंगणवाडीचे विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

योगा करून आंतराष्ट्रीय योगा दिवस चांपा ग्रामपंचायत कार्यालयात मोठया उत्साहात योगा दिवस  साजरा करण्यात आला .


      

   

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button